… महाभारतात विदुर हा धृतराष्ट्राचा प्रधानमंत्री. महाप्रज्ञ, परमनीतिज्ञ, सत्यनिष्ठ आणि धर्माचे मर्म जाणणारा. जेंव्हा युद्ध अटळ झाले, तेंव्हा विदुराने धृतराष्ट्राला केलेला उपदेश म्हणजे विदुरनीति. हा भाग धृतराष्ट्र आणि विदुर यांच्या मधील संवाद म्हणून महाभारतातील उद्योग पर्वात आला आहे.
मागच्या भागात आपण वैशाली काळे गलांडे यांच्या कडून विदुरनीति मध्ये सांगितलेला निस्वार्थ, शांती, अहिंसेचा बोध ऐकला. आजच्या भागात विदूर सांगत आहेत – गोड बोलावे, दुष्टांचा आदर करू नये, हव्यास धरू नये, न्यायाने धन मिळवावे, सत्पात्री दान करावे. अपात्री दान, परस्त्रीची अभिलाषा आणि दुसऱ्याच्या धनाचा लोभ धरणे हे पाप आहे.
आपल्या मृत्युनंतर आपल्या सुखकारक आठवणी काढणे, आपल्याबद्दल चांगलं बोलले जाणे म्हणजे स्वर्ग, आणि मृत्युनंतर मागे राहिलेल्यांनी आपल्या वाईट आठवणी काढून आपल्याला नावं ठेवणे म्हणजेच नर्क!
वर मिळणे, राज्य मिळणे व पुत्रप्राप्ती होण्याचे जे सुख आहे त्याच्या बरोबरीचे दु:ख एकटा शत्रू देऊ शकतो. म्हणून एकतर बलशाली लोकांचे शत्रुत्व ओढवून घेऊ नये, नाहीतर शत्रूचा नायनाट करून टाकावा.
म्हणून राजा, पांडवांना त्यांचे राज्य परत देऊन टाक! ऐकुया आजच्या भागात …
– गीताग्रजा (डॉ. वैशाली काळे गलांडे)