भाषा – मराठी
लेखक – दीपाली पाटवदकर
पृष्ठ – १००
किंमत – १२०/-
Click To Order |
नक्षत्रांची फुले हे एका आकाशवेड्याचे भावविश्व आहे. आकाशाची ओळख करून देणारे, आकाशाच्या आणि प्रकाशाच्या गोष्टी सांगणारे पुस्तक आहे. त्या गोष्टींना पुराणातील संदर्भ आहेत. आणि आजचे दाखले आहेत.
सभोवती ती रात्र दाटली, तारकांची ही झाली दाटी
उमललेल्या नक्षत्रांची, पहा हासरी फुले जाहली
चमचमत्या त्या सौंदर्यानी, निहारिका ती अशी झळकली
तारांगणी त्या घेता गिरकी, नक्षत्र फुले ती बरसू लागली!
– डॉ. ज्योती रहाळकर, पुणे
या पुस्तकात गोष्टी आहेत, पुराण आहे, चित्र आहेत, कविता आहेत आणि विज्ञान सुद्धा आहे. हे पुस्तक केवळ मनोरंजनात्मक नाही तर त्याला एक अध्यात्मिक खोली सुद्धा आहे. प्राचीन कालगणना, चंद्राच्या कोरीचे रहस्य, चंद्रावर आपल्याला ससा आणि अमेरिकन्सना माणूस का दिसतो, अशा कितीतरी गोष्टी खूप सोप्या करून सांगितल्या आहेत. इतक्या सोप्या की चंद्र आणि पृथ्वी एकमेकांशी फुगडी खेळत सूर्याला प्रदक्षिणा घालतात हे मुलीला वाचून दाखवलं आणि तिचा गोंधळच मिटला. आवर्जून वाचावे असे पुस्तक!
– विभावरी बिडवे, पुणे
काही काही पुस्तके वेड लावुन जातात… त्यातलं एक ‘नक्षत्रांची फुले’! राम आणि श्याम हे दोघे जुळे भाऊ. श्याम म्हणजे Science, Technology आणि Astronomy. तर राम रूढी परंपरा जपणारा, नक्षत्रांमध्ये रमणारा. या दोघांना एकत्र आणण्याचे सुंदर काम या पुस्तकाने केले आहे. अफाट ज्ञान असलेल्या ह्या दोन्ही प्रवाहांना एकत्र गुंफून सहज सुंदर पद्धतीने आपल्या समोर आणले आहे.
– अमेय देशपांडे, पुणे