… महाभारतात विदुर हा धृतराष्ट्राचा प्रधानमंत्री. महाप्रज्ञ, परमनीतिज्ञ, सत्यनिष्ठ आणि धर्माचे मर्म जाणणारा. जेंव्धृहा युद्तध अटळ झाले, तेंव्हा विदुराने धृतराष्ट्राला केलेला उपदेश म्हणजे विदुरनीति. हा भाग धृतराष्ट्र आणि विदुर यांच्या मधील संवाद म्हणून महाभारतातील उद्योग पर्वात आला आहे.
मागच्या भागात आपण वैशाली काळे गलांडे यांच्या कडून विदुरनीति मध्ये सांगितलेली पंडित लक्षणे ऐकली. आज मुर्खांची लक्षणे ऐकू. वैशाली ताईंनी पहिलेच लक्षण सांगितले आहे, “जे लोक कोणतेही शिक्षण / कला / कौशल्य आत्मसात न करता गर्व करतात किंवा काम न करता धनाची (पगाराची) अपेक्षा ठेवतात ते मूर्ख असतात. कर्म न करता फळाची अपेक्षा करतो तो मूर्ख.”
– गीताग्रजा (डॉ. वैशाली काळे गलांडे)