श्री आनंद कानिटकर सांगतात – वारी देहू – आळंदी हून निघते आणि पंढरपूरला जाते. शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे. आपण काय करतोय, याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या रस्त्याच्या भोवतीने आपली शहरं वाढत आहेत. त्यांचा रस्त्याने महामार्ग तयार करत आहोत. आपण विकासाच्या प्लानिंग मध्ये त्यांच्या मार्गाचा विचार करायला हवा. किंवा इतकी वर्ष रस्त्यात चौकाचौकातून गणपती बसतात, तर शहराच्या विकासाच्या प्लान मध्ये त्यांचा विचार केला गेला पाहिजे.
वारी आली, गणपती आले की त्यांच्या मुळे रस्त्यात गर्दी होते, रस्ते बंद होतात असे स्थानिकांना वाटते. पण हे प्रश्न त्यांच्यामुळे उपस्थित होत नसून, शहराच्या विकासात त्यांचा विचार न केला असल्याने होते.