भाषा – English
भाषा – ब्रज, मराठी
संपादक – श्री रणजित हिर्लेकर
पृष्ठ – ५०
किंमत – ८०/-
Click To Order |
उत्तर प्रदेशात यमुना नदीच्या तीरावर त्रिविक्रमपूर (तिकवॉंपूर) नावाचे एक गाव होते. तिथे रत्नाकर नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. याला चार मुले होती. चौघेही कवी होते. मोठे तिघे मुगलांच्या सेवेत होते. पण परकीयांची चाकरी काही धाकट्या भावाला पटत नव्हती. तो बाहेर पडला. चित्रकूटचा राजा रुद्रप्रतापने या नवीन कवीचे वीररसपूर्ण काव्य ऐकले, आणि त्याच्यावर “कवी भूषण” हे नाव बहाल केले.
शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून तो रायगडावर आला होता. त्याची विद्वत्ता आणि काव्य ऐकून महाराजांनी त्याला राजकवी म्हणून नेमेलं. भूषणाने या काळात महाराजांचा राज्यकारभार, त्यांचा रणांगणावरील पराक्रम आणि त्यांचे तेजस्वी चारित्र्य जवळून पहिले. कविराजाची प्रतिभा उचंबळून आली, आणि त्याने काव्यात्मक शिवचरित्र लिहिले – शिवभूषण! कवी भूषणाची लेखणीतून उतरलेले हे एक काव्यपुष्प –
कुंद कहा पयवृंद कहा अरू चंद कहा सरजा जस आगे ।
भूषन भानुकृसानु कहा ब खुमान प्रताप महीतल पागे ।
राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रन में अनुरागे ।
बाज कहा मृगराज कहा अति साहसमें सिवराज के आगे ||