भाषा – English
भाषा – मराठी
लेखक – श्री रणजित हिर्लेकर
पृष्ठ – १५०
किंमत – १६०/-
Click To Order |
कवी भूषणाने महाराजांचा राज्यकारभार, त्यांचा रणांगणावरील पराक्रम आणि त्यांचे तेजस्वी चारित्र्य जवळून पहिले. कविराजाची प्रतिभा उचंबळून आली, आणि त्याने काव्यात्मक शिवचरित्र लिहिले – शिवभूषण! ब्रज भाषेत हे काव्य लिहिले आहे. ही भाषा उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बोलली जात होती. असे असले तरी भूषणाचे काव्य तीनशे वर्षांपूर्वीच्या शुद्ध ब्रज भाषेतील आहे व त्यात अरबी, फार्शी शब्दांचा भडीमार आहे. यामुळे आज भूषणाच्या छंदांचा अर्थ मराठी माणसाला लागत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी कवी रणजित हिर्लेकर यांनी भूषणाच्या काव्याचा मराठी अनुवाद केला आहे. त्या मधील अग्राहून सुटकेचे वर्णन करणारे हे एक काव्य पुष्प
चारीकडे चुगताई चौकी चौकि घातकी
शिवराज खांद्यावरी घेई मेवा कावडी।।
डुलत डुलत सारे घाटाकडे चालती
खांद्यावरी घेऊनिया मिठाईच्या कावडी।।
उतरला वेश अवडंबर ते नाटकी
बदलून वेष घेई खांद्यावर कावडी।।
पंछी होऊन उडाले की गुप्त झाले शिवाजी
थक्क झाले शिपाई ते तपासून कावडी।।