भाषा – मराठी
लेखक – ओंकार रवींद्र जोशी
पृष्ठ – ८०
किंमत – १२०/-
Click To Order |
श्री. ओंकार रविंद्र जोशी गेली १५ वर्षे बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत असून सध्या एसबी आय लाईफ इन्शुरन्स कंपनीत प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या परिवारासह मुंबई येथे राहातात. नोकरी सांभाळून वाचनाची, प्रवासाची व ट्रेकिंगची आवड त्यांनी जोपासली आहे, थोरामोठ्यांकडून मिळालेलं ज्ञान तसेच भारतीय परंपरा व वेदपुराणांतील अध्यात्म या विषयी असलेल्या कुतूहलातून लेखन प्रवासाची सुरुवात झाली व ब्रह्मराक्षस ही कथा साकारली.
ही कहाणी आहे ब्रह्मराक्षसाची … तो भूतकाळाच्या पडद्या आडून वर्तमानाला खुणावत होता. त्या पडद्याआड होती त्याची लोभी वृत्ती, त्यातून जन्मलेली ईर्षा आणि त्या ईर्षेतून आलेला क्रूरपणा. ह्या साऱ्या गोष्टी त्याला मान्य होत्या, नव्हे नव्हे त्याच्या जगण्याचा आधारच होत्या. स्वकीयांच्या प्राणांची आहुती ही त्याने ह्या मोहाच्या यज्ञवेदीत अगदी सहजच दिली होती. पण ह्या सर्वांचे पडसाद आज उमटत होते. हा प्रवास फार पूर्वीपासून सुरू झाला होता. त्याची कर्म त्याचा पाठलाग करत होती आणि तो अडकला ह्या कर्मांच्या फेऱ्यात. हपापला होता मुक्ती साठी. शापाने जीर्ण झालेला देह मिरवीत होता मुक्ती च्या आशेने. ती मुक्ती जी एकाचवेळी घेऊन येणार होती कुणाचा तरी जन्म आणि कुणाचा तरी मृत्यू.
ही कहाणी त्याच्याच जन्मोजन्मीच्या प्रवासाची! त्याच्या कर्मगाथेची! त्याच्या मुक्तीची! कहाणी ब्रह्मराक्षसाची …